Sep 22, 2010

कुंपणाबाहेरचे कुरण नेहमी जरा जास्तच हिरवे दिसते.

जीवाच्या सरळपणाला मनाचा खोडकरपणा नेहमीच डिवचत असतो.

सरळ वाटेचा तोचतोचपणा आणि आज्ञाधारकता मरगळ आणणारी होते; तर नागमोड्या वळणांवरून धावण्याची हौस जीव मुठीत घ्यायला लावते.

मयाचा बुद्धीवरचा पडदा, खात्रीने न मिळणाऱ्या गोष्टी अधिक आकर्षक करून दाखवतो आणि त्याच्या भूलथापांना व्यवहारीसुद्धा भुलतो.
 कधीतरी हा पडदा सरणार, किंबहुना तो दूर करावाच लागणार हे माहित असूनही मनाची रुंजी त्याभोवती चालूच राहते.


ह्या घालमेलीत काही घुटमळत राहतात, काही वज्राच्या काठीण्याने तो पडदा चिरून बाजूला करतात; तर काही बिलंदर मयावरही कुरघोडी करून त्याने रचलेले चित्र प्रत्यक्षात साकारतात!
 
स्वतःच निर्मिलेल्या नाट्यातील पात्रांच्या ह्या अदा निर्मिकाची छान करमणूक करतात!

1 comment: