रोजसारखीच आणखी एक सकाळ. चाकरमान्यांची office गाठण्याची लगबग. churchgate station च्या लगोलग लोकांचे जत्थेच्या जत्थे फुटपाथवरून जात असतात. त्या काळ्या-पांढऱ्या formal गर्दीत एक रंगीबेरंगी आकृती लक्ष वेधून घेते. काळ्या शिसवी अंगावर हळद, कुंकू, गुलाल यांचे रंगीबेरंगी पण एका विशिष्ट पद्धतीने ओढलेल्या बोटांचे पट्टे, कपाळी ठसठशीत टिळा, इंद्रधानुष्यातला एकही रंग सुटणार नाही असे कमरेचे नेसू, पायांत चाळ आणि हातात विटलेला आसूड...जरीमरीच्या त्या आकृतीवरून नजर हटत नाही. बालपणी मनावर कोरले गेलेले जरीमरीच्या आसूडाच्या फटकार्यांचे आवाज आणि दुरून जवळ येणाऱ्या हलगीच्या आवाजाने मनातून घाबरलेली लहान मुले..मनात तरळून गेली. लहानपणी दरारा वाटणारी ती आकृती आज मात्र उलट दिशेने वाहणाऱ्या गर्दीत हताशपणे उभी दिसत होती. त्याच्या पसरणाऱ्या हाताला कुणीही भीक घालत नव्हते. बदललेल्या जमान्यात तो इतर भिकार्यांसारखा फक्त एक भिकारी झाला होता. देवाच्या पायावर वाहू घातलेल्या ह्यांच्या पिढ्यानपिढ्या. ह्या भक्तीच्या बदल्यात इतर समाजाकडून मिळणारे दान आज भीक झाले आहे. मुंबईत भिकार्यांचे settings असतात, त्यांचा भरपूर फायदा असतो; अशा गप्पा बर्याच वेळा कानावर पडतात..खरे असेलही हे सारे कदाचित; पण रस्त्यांवर भटकणारे जरीमरी कुटुंब, एखाद्या सकाळी वाट चुकून society च्या gate वर येऊन दानाच्या आशेने मोठमोठ्याने गाणारा वासुदेव ह्या सगळ्यांची अवस्था मुंबई सारख्या शहरात फार दयनीय असेल असे वाटते. काळाच्या वरवंट्याखाली भरडल्या जाणाऱ्या ह्या जीवांना आणि ते जाणते-अजाणतेपणी जपत असलेल्या सांस्कृतिक परंपरांना त्यांच्यातील परमेश्वरच मदतीचा हात देवो आणि ते तो डोळसपणे हातात घेवोत हि सदिच्छा!
Jan 3, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
outstanding...this post is as good as, or I must say better than a lot of stuff that you get to read these days in marathi newspapers...
ReplyDeleteKeep writing...
thank you Prasad :)
ReplyDelete