Apr 2, 2011

विजयोन्माद

इतर कशाहीपेक्षा विजयाचा कैफ गहिरा असतो. त्याची धुंदी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी घ्याव्या लागलेल्या सगळ्या कष्टांचा अडीअडचणींचा विसर पाडते. त्यातूनही असा एखादा धुरंधर जो स्थितप्रज्ञतेचा सदरा पांघरून आकाशाला गवसणी घालण्याच्या ध्येयावर विजय मिळवितो त्याचा स्वानुभव नक्कीच शब्दातीत असणार!
विजय- जीवनाने घेतलेल्या प्रत्येक आकाराचे उद्दिष्ट, एकमेव सत्य; ज्याचा परिणाम फक्त विजयवीरावरच होत नाही; तर तो विजय पाहणाऱ्या, त्याच्याविषयी ऐकणार्या प्रत्येक दुबळ्या जीवाच्या मनात आशेची आणि उत्साहाची पालवी तो फुलवीत असतो....
....विजयी भव!

1 comment:

  1. Vijayachya bharpur shubhechaa Trupti...... Feeling proud and happy...we are world champs!!!!

    ReplyDelete