Jul 24, 2011

निर्मिकाचे ऋण

त्या निर्मिकाने इतके दिले आहे कि ह्या घेणारीची झोळीच कमी पडते. काही मोहाच्या कमकुवत क्षणांना धुसफूस होतेही पण पुढच्याच काही पावलांत त्याच्या अस्तित्वाची आणि आशीर्वादाची, त्या भरभक्कम पाठबळाची प्रचीती येते आणि पुन्हा कृतज्ञतेने मन भारावून जाते! ह्या भवसागरात एक कस्पट मी; तरीही किती चोख व्यवस्था लावली आहे त्याने माझ्यासाठी! त्याने जे काही दिले आहे त्याची परतफेड तर अतर्क्यच, मात्र मिळालेल्याचा अनादर ह्या वेडीकडून होऊ नये हीच इच्छा. त्याने जे काही दिले आहे त्याबद्दल अंतकरणापासून आभार आणि त्याहूनही मोठे ऋण म्हणजे; मला मिळाले आहे, मिळत आहे आणि मिळणार आहे हे कळण्यासाठी दिलेली जाण.

No comments:

Post a Comment