Oct 3, 2010

कॉफी आणि मी

        चहा हे जगात सर्वाधिक प्यायले जाणारे पेय. मला मात्र नेहमीच कॉफी भुरळ घालते. उकळत असतानाच दरवळणारा तिचा मृद्मयी सुगंध धुंद करतो. ओठी लागण्याच्या कितीतरी आधीच हा दरवळणारा सुगंध मंदावलेल्या चेतापेशींना चेतवू लागतो! कॉफी हाउसच्या बाजूने जातानाही काहीसा असाच अनुभव. तिथे तर कॉफी प्रेमींसाठी पर्वणीच! जसा मूड तसा फ्लेवर चाखायची मजा... ' meeting over a coffee ' हा जणू काही एक सोहळा! एक आनंदमयी सामाजिक अनुभव.

        ' एक पेय' ह्या साध्या संकल्पनेच्या कितीतरी पुढे जाऊन कॉफी मनाला भिडते, वेड लावते. perfumes खरेदी करत असताना दोन tasters च्या दरम्यान कॉफीच्या बिया हुंगायला देतात जेणेकरून कॉफीच्या earthy , nutty सुगंधामुळे दोन अत्तरांच्या सुगंधामधील फरक नीट ओळखता यावा. अशावेळी माझी मात्र गोची होते. कॉफीच्या त्या वेडावणाऱ्या वासानंतर मला कुठलाच सुगंध खूप छान वाटत नाही!

         आतासुद्धा इटलीहून आणलेल्या expresso -maker मध्ये बनवलेल्या कॉफीचे घुटके घेत घेत हा कॉफीनामा लिहिण्याची मजा काही औरच! कॉफी आणि माझ्यामधील ऋणानुबंध दृढ करणारी ही खरेदी केल्याबद्दल मला माझा आणि मंदारचा अभिमान वाटतो!

        असा हा कॉफीचा महिमा..संपणे थोडे कठीणच..भरच घालायची झाली तर कॉफीचा औषधी गुण वगैरे वगैरे दुय्यम बाबी....

        आह! माझा कॉफी कप आता रिता झाला आहे..माझ्या साऱ्या जाणीवा तरतरीत करून गेला आहे!
 
I  love  coffee !

1 comment: